Bhagwan Buddhanche Sevak - Anand * भगवान बुद्धांचे सेवक - आनंद (मराठी)
* भगवान बुद्धांचे सेवक - आनंद *
या पुस्तकात बुद्धांचे चुलत भाऊ व त्यांचे सेवक आनंद दुसऱ्यांची सेवा करण्यात व स्मृतिमान होण्यात अग्र होते.
त्यांनी बुद्धांसोबत त्यांच्या छायेप्रमाणे राहून त्यांची सेवा केली.
त्यांनी बुद्धांच्या सर्व उपदेशांना बहुदा प्रत्यक्ष बुद्धांकडूनच ऐकले होते.
बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर लगेचच ५०० अरहंत भिक्षूंच्या संगायनात आनंदांनी बुद्धांनी दिलेल्या उपदेशाचे संगायन केले, जे कालांतराने पाली वाङ्गमयात सुत्त पिटकाच्या नावाने प्रसिद्ध झाले.
त्यामुळे ते धम्माचे धम्मभंडारिक या नावाने विख्यात झाले. त्यांचे जीवन चरित्र, धर्माच्या प्रसारात त्यांचे कार्य, भिक्षुणी संघाच्या स्थापनेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान यांचे वर्णन आहे.
त्यासोबतच बुद्धांसोबत तसेच अन्य ज्येष्ठ भिक्षूंसोबत विपश्यना ध्यानाच्या सूक्ष्म पैलूंवर त्यांनी केलेल्या चर्चेचेही वर्णन आहे.